मुंबई - माजी भाजप नेत्या तथा प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन देणारे कन्हैया लाल यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली ( Udaipur Killing ) होती. त्यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या मुंबईतील गिरगाव येथील 16 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी मिळाली ( Mumbai Girl Gets Death Threat Facebook Post ) होती. त्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला जम्मू-कश्मीर मधून मुंबई पोलिसांनी अटक केली ( Mumbai Police One Arrested Jammu And Kashmir ) आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असतात 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
फयाज अहमद गुलाम मोहम्मद भट ( वय 30, जम्मू-कश्मीर ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणीने तिच्या फेसबुक वॉलवर कन्हैया लालच्या हत्येबाबत काही मत व्यक्त केली होती. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिला व्हॉट्सअॅप कॉल केला आणि पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या मताबद्दल तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.