महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray : राज ठाकरेंचा अल्टिमेटम : मुंबई पोलीस सज्ज.. ५ मिनिटात पोहोचणार घटनास्थळी - मुंबईतील संवेदनशील भाग

३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे ( Loudspeaker On Mosque ) बंद न केल्यास हनुमान चालीसा लावून प्रत्त्युत्तर देण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यावरून होणाऱ्या तणावाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले ( Mumbai Police on Raj Thackeray Ultimatum) आहेत. अनुचित घटना घडल्यास अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी ( Sensitive Areas In Mumbai ) पोहोचण्याचा प्लॅन ( Police Patrolling In Mumbai ) मुंबई पोलिसांनी तयार केला आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : Apr 21, 2022, 9:05 PM IST

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या ( Loudspeaker On Mosque ) विरोधात ३ मे पासून हनुमान चालीसा लावून प्रत्त्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. मनसेचे आंदोलन आणि त्यावरून निर्माण होऊ शकणारी परिस्थिती लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पूर्वतयारी केली ( Mumbai Police on Raj Thackeray Ultimatum ) आहे. पोलिसांनी मुंबईतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांची यादी तयार केली ( Sensitive Areas In Mumbai ) असून, त्यानुसार व्यहरचना आखण्यात आली आहे. मुंबईत २४ तास पोलिसांची गस्त सुरु करण्यात आली ( Police Patrolling In Mumbai ) आहे. अनुचित घटना घडल्यास मुंबई पोलीस पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ठाण्यातील सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे -३ मे पर्यंत भोंगे उतरावा नाहीतर हनुमान चालीसा सुरूच राहील. ३ तारखेला ईद आहे. माझे राज्य सरकारला आवाहन आहे. महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडवायचे नाही. सर्व मशिदीवरील भोंगे खाली घ्या. नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी गृह खात्याला डेड लाईन देऊन स्पष्ट केले आहे.

३ मे रोजी मनसेची महाआरती : राज्यात सध्या भोंगे चर्चेत आहेत. सर्व मशिदींवरील भोंगे तीन तारखेपर्यंत उतरले नाही तर येणाऱ्या परिणामांना तयार रहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता हा वाद काही शांत होण्याच्या मार्गावर नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी नुकतीच मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील याच मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ( MNS Maha Aarti ) आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भोंगे लावून राज्यभर महाआरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : MNS Maha Aarti : 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मनसेची राज्यभर महाआरती.. भोंगे लावून करणार आरत्या

ABOUT THE AUTHOR

...view details