महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police : तब्बल नऊ वर्षांनी बेपत्ता मुलीची कुटुंबीयांशी भेट अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे आयुक्तांकडून कौतुक

Mumbai Police : नऊ वर्षांनी बेपत्ता मुलीची कुटुंबीयांशी भेट, डिसोझा दाम्पत्यानं आपल्या मुलीप्रमाणं सांभाळलं. मात्र तीन वर्षानंतर त्यांना स्वत:ची मुलगी झाली. नंतर त्यांनी पूजावर अन्याय करायला सुरुवात केली.

Mumbai Police
Mumbai Police

By

Published : Aug 7, 2022, 9:44 AM IST

Updated : Aug 7, 2022, 10:25 AM IST

मुंबई - मुंबईच्या अंधेरीतील डीएन नगर पोलीस परिसरात 9 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यात डी एन नगर पोलिसांना यश आले आहे. 22 जानेवारी 2013 रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यावेळी ती 7 वर्षांची होती. 4 ऑगस्ट रोजी तब्बल 9 वर्षांनी हरवलेली मुलगी तिच्या कुटुंबीयांना भेटली आहे. या प्रकरणात डी एन नगर पोलिसांनी डिसोझा नामक व्यक्तीला आणि त्याची पत्नी सोनी याना अटक केली आहे. या कामगिरीत मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र धोंडू भोसले यांचा मोलाचा हातभार लागला आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुद्धा डी एन नगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Mumbai Police

टीमने मुलींचा शोधात अथक परिश्रम घेतले -विशेष म्हणजे राजेंद्र धोंडू भोसले हे मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक होते. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यानी 166 मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे नोंदवली होती. या मुली 2008 ते 2015 दरम्यान बेपत्ता झाल्या होत्या. राजेंद्र भोसले आणि त्यांच्या टीमने मुलींचा शोधात अथक परिश्रम घेतले, आणि 166 पैकी 165 शोधून काढले. परंतु, या दरम्यान 166 व्या मुलीचा सुगावा लागला नाही. भोसले नोकरीच्या काळात 2 वर्षे आणि निवृत्ती नंतरही 7 वर्षे या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत राहिले होते.

मुलीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू -अटक करण्यात आलेल्या डिसोझाची मुंबई पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने मुलीला शाळेजवळ फिरताना पाहिले होते. आणि त्याला स्वतः ची मुले नसल्यामुळे तिला आरोपी सोबत घेऊन गेले होते. शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाइकांनी डीएन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही बाब तत्कालीन सहायक उपनिरीक्षक राजेंद्र धोंडू भोसले यांच्या निदर्शनास आली. यादरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याच्या बातम्या मीडियात प्रदर्शित होऊ लागल्या आणि स्थानिक लोकांनीही मुलीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. आरोपी डिसोझाने जवाबात पोलिसांना सांगितले की, या सगळ्याच्या भीतीने त्याने मुलीला तिचे मूळ कर्नाटकातील रायचूर येथील वसतिगृहात पाठवले. डिसूझा आणि सोनीला 2016 मध्ये मुलगा झाला. अशा स्थितीत त्यांनी मुलीला कर्नाटकातून परत बोलावले. कारण त्यांना दोन मुलांचे संगोपन करणे परवडत नव्हते. त्यांनी नंतर तिला बेबीसिटर म्हणून काम करण्यास भाग पाडले होते.

डिसूझा कुटुंब अंधेरी (पश्चिम) च्या त्याच गिल्बर्ट हिल भागातील एका घरात स्थलांतरित झाले होते. जिथे मुलगी मूळ राहत होती. डीएन नगर स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले की, डिसूझा कुटुंबीयांना आता खात्री झाली होती. की इतक्या दिवसांनी मुलीला कोणी ओळखणार नाही. डिसूझाने तरूणीला परिसरात कोणाशीही बोलू दिले जात नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी डिसोझा आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध अपहरण, मानवी तस्करी, चुकीच्या पद्धतीने कोठडीत घेणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -Deepak Kesarkar : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा फॉर्म्युला का नाही-दीपक केसरकर

हेही वाचा -Atul Londhe Criticised on BJP : सामान्यांना तिरंगा फडकवण्याचा अधिकार काँग्रेसने दिला, भाजपने लोकशाहीचा गळा घोटला- अतुल लोंढे

Last Updated : Aug 7, 2022, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details