महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धोकादायक इमारतीमुळे पोलीस कुटुंबीयांचा जीव टांगणीला

पावसाळा आला की मुंबईमध्ये अनेक समस्यांना नागरिकांना समारे जावे लागते. यातील मुख्य समस्या म्हणजे रस्त्यावर पाणी तुंबण्याची आहे. वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या तर आहेच त्याचबरोबर धोकायदायक इमारतींचा मुद्दादेखील पावसाळ्यात ऐरवणीवर येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा इमारती बद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये सर्व पोलीस दलातील जवान राहत आहेत.

धोकादायक इमारत
धोकादायक इमारत

By

Published : Jun 14, 2021, 8:10 AM IST

मुंबई- पावसाळा आला की मुंबईमध्ये अनेक समस्यांना नागरिकांना समारे जावे लागते. यातील मुख्य समस्या म्हणजे रस्त्यावर पाणी तुंबण्याची आहे. वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या तर आहेच त्याचबरोबर धोकायदायक इमारतींचा मुद्दादेखील पावसाळ्यात ऐरवणीवर येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा इमारती बद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये सर्व पोलीस दलातील जवान राहत आहेत. मुंबईचे रक्षण करणारेच पोलीस धोकादायक इमारतीमध्ये राहतात आणि प्रशासन मात्र डोळे झाकून झोपले आहे.

धोकादायक इमारतीमुळे पोलीस कुटुंबीयांचा जीव टांगणीला

24 कुटुंबाचा जीव टांगणीला

वरळीच्या पोलीस कॅम्प परिसरात ही इमारत आहे. पोलीस कॅम्पमध्ये 36 नंबरच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ही इमारत एवढी दयनीय झाली आहे, की इमारतीच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागेल. ही इमारत उभारली गेली 1984 साली. चार मजल्याच्या या इमारतीमध्ये 24 कुटुंब राहतात महत्त्वाचे म्हणजे ही सगळी कुटुंब पोलीस कर्मचाऱ्यांची आहेत. या 24 कुटुंबाचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळा आला की इमातीच्या आता भिंतीतून पाणी झिरपून घरात येते. रात्री अपरात्री पाऊस आला की घरात पाण्याचे लोट वाहतात. घरात शिरणारे पाणी बाहेर काढता काढता सकाळ होते. मात्र पाऊस थांबत नाही पाण्याचा ओघ घरात येतच राहत असल्याचे इथले रहिवासी सांगतात.

'वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष'

या इमारतीच्या आत प्रवेश केला की, इमारतीचा जिना इतका जीर्ण झाला आहे की कधी तो कोसळेल याची भिती वाटते. प्रत्येक मजल्यावर जिन्यावरचे प्लास्टर निघून गेले आहे. सिमेंटने हे बाहेर आलेले इमारतीचे गज पुन्हा इमारतीमध्ये ढकलण्यात आले आहे. इमारतीच्या आतमध्ये 24 घरे आहेत. प्रत्येक घराचे सिलिंक तुटलेले आहे. पावसामुळे घराच्या भिंती ओल्या आहेत. इमारतीला बाहेरून पाहिल्यावर असे वाटते की, ही इमारत एखाद्या पडीक बांधकामाचा भाग आहे. इमारतीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. तळमजल्यापासून ते शेवटच्या मजल्यापर्यंत या भेगा गेल्याचे दिसत आहे. इमारतीच्या पिलरमधून गंजलेले गज बाहेर आले आहेत. इमारती विषयी वारंवार तक्रारी करुन देखील प्रशासन दुर्लक्ष्य करत आहे, अशा येथील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा -ईटीव्ही ग्राउंड रिपोर्ट : सायळीसह साताऱ्यातील २७ गावात आतापर्यंत एकही नाही कोरोना बाधित

ABOUT THE AUTHOR

...view details