मुंबई - पोलिसांनी पी-३०५ प्रकरणात काही कंपन्यांना समन्स बजावले आहेत. तौक्ते चक्रीवादळात बार्ज पी-305 बुडाले होते. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. तर 188 कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाने वाचवले होते. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणात बार्जमधून वाचलेल्या १० जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवलेले आहेत.
हेही वाचा -नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश
पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्य केला. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी हे बचावकार्य सुरू झाले होते.