मुंबई:उद्धव ठाकरे गटानं बनावट शपथपत्र (forged affidavit) दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी केला असून याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची (Mumbai Police Crime Branch) चार पथकं चार जिल्ह्यात दाखल झाली आहेत. 4500 बनावट शपथपत्र आढळल्या प्रकरणी गुन्हे शाखेची टीम कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघर सोबतच इतर ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणात निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Uday Samant: ठाकरे गटाने बनावट शपथपत्र दाखल केले - उदय सामंत, मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये - मुंबई पोलीस कारवाई
बनावट प्रतिज्ञापत्र (forged affidavit by thackeray group) प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम (Mumbai Police Crime Branch) ऍक्शन मोडमध्ये आली आहे. गुन्हे शाखेची टीम कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघर सोबतच इतर ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.
![Uday Samant: ठाकरे गटाने बनावट शपथपत्र दाखल केले - उदय सामंत, मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये Uday Samant](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16621758-thumbnail-3x2-udaysamant.jpg)
उदय सामंत
तपास सुरू: या कारवाईत पोलीसांना आत्तापर्यंत ४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे आढळून आली आहेत. मुंबई पोलिसांनी अशाप्रकारची कारवाई माहिम आणि अंधेरी येथेही केली आहे. पोलीसांना आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा संशय असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान याप्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाच्या सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.