महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Actor Salman Khan Threaten Case : अभिनेता सलमान खानला धमकी; मुंबई पोलिसांना पटली आरोपीची ओळख - मुंबई पोलिस दल

अभिनेता सलमान खानला पाच जून रोजी मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. बिश्नोई गँगच्या विक्रम बराड यानेच सलमान खानला धमकी दिल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. बराडच्या साथिदारांनी महाकालची कल्याणला भेट घेतल्याची माहितीही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आहे आहे.

Actor Salman Khan Threaten Case
अभिनेता सलमान खान

By

Published : Jun 10, 2022, 1:15 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला पाच जून रोजी मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. राजस्थानमधील व्यक्तीने धमकीचे पत्र सलमान खानपर्यंत पोहोचवल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील सूत्रांकडून मिळाली आहे.

लॉरेन्स बिश्नोईचा साथीदाराने पोहोचवले पत्र -गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड यानेच हे धमकीचे पत्र सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणी तपास करत आहे. विक्रम बराडवर आतापर्यंत 24 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. तो राजस्थानच्या हनुमानगढ येथील रहिवासी आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा प्रसिद्धीसाठी स्टंट -बॉलीवूड स्टार सलमान खानला आलेले धमकीचे पत्र हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा प्रसिद्धी स्टंट असल्याचे मुंबई पोलिसांनी गुरुवारी सांगितले. सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या बिष्णोईचा सहकारी विक्रम बराड याच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे पत्र देण्यासाठी तीन जण मुंबईत आले होते. त्यांनी सौरभ महाकालची कल्याणमध्ये भेट घेतली होती. मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत माहिती समोर आली आहे. सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रामागे विक्रम बराडची प्रमूख भूमिका असल्याचे चौकशीत समोर आले आहे. बरड हा राजस्थानातील हनुमानगड येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बराड हा देशाबाहेर फरार असल्याची चर्चा असते. विक्रम बराड हा राजस्थानमधला कुख्यात गुंड आहे. त्याचे एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात गुंड आनंद पाल याच्या अनमोल या भावासोबतही संबंध आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांकडून विक्रम बराडला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

विक्रम बराड भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत -विक्रम बराड हा भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना रविवारी 5 जून रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची टीम -सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची एक टीम तात्काळ दाखल झाली होती. ज्या ठिकाणी धमकीचे पत्र मिळाले त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु होता. सलमानने घराबाहेर येऊन क्राईम ब्राँचच्या टीमला सहकार्य केल्याचे दिसून आले. सलीम खान यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकीचे पत्र सापडले होते.

मुसेवाला करण्याची धमकी - सलीम खान वॉकला गेल्यानंतर दररोज जिथे रोज विश्रांती करतात, तिथे एका बेंचवर हे पत्र सापडले आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांना गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. मुसेवाला जैसा कर दुंगा अशा आशयाचे ते पत्र होते. गेल्या आठवड्यात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याची माहिती समोर आली होती. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण लॉरेंस बिश्नोईने याआधी सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता.

लॉरेंसचा व्हिडीओ झाला व्हायरल -लॉरेंसने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेंसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2021 मधील आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेंस आणि त्याच्या गँगला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मकोका केसअंतर्गत ताब्यात घेतले होते. या व्हिडीओमध्ये लॉरेंससह त्याचा साथीदार संपत देखील दिसत आहे. संपत हा लॉरेंसचा राजस्थानचा साथीदार आहे. संपतने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रेकी केली होती. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details