मुंबई -मुंबई शहरातील, राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले स्मार्टफोन ( Smartphone theft ) देशातील विविध राज्यांत विक्री करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आज करण्यात आलेल्या मानखुर्द येथील कारवाई मध्ये 480 स्मार्टफोन तसेच गांजा, देशी-विदेशी दारू ( Confiscation of domestic and foreign liquor ) तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त ( Seizure of deadly weapon ) करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांकडून 74 लाख 78 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
74 लाख 78 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त - पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मानखुर्द येथे सापळा रचून स्मार्टफोनची चोरी करून विकणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई या ठिकाणी अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्याचे 490 स्मार्ट फोन ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये 41 अॅपल कंपनीच्या मोबाईल फोनचा ( Apple mobile phone ) देखील समावेश आहे. 1 लॅपटॉप हिटरमशीन, हिटरगन असे साहित्यासोबतच 9 कि. 720 ग्रॅम वजनाचा गांजा, देशी-विदेशी दारूच्या एकूण 174 बाटल्या, 2 तलवारी अशी एकूण 74 लाख 78 हजार 522 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उद्या त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.