मुंबई - व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याचा प्रकरणात फरार असलेल्या डीसीपी सौरभ त्रिपाठीच्या अडचणी वाढल्या ( Angadiya extortion case ) आहेत. याप्रकरणी डीसीपी सौरभ त्रिपाठीच्या निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृहविभागाकडे पाठवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली ( Mumbai Police proposes suspension of Saurabh Tripathi ) आहे. खंडणी प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित करण्यात यावं असा प्रस्ताव आज गृहविभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई पोलिस दलामध्ये यापूर्वीही खंडणी प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले आहे. त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी हे सर्व आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी लावले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला होता.
अटकेची तलवार
मुंबई एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. 3 मार्च रोजी एल टी मार्ग पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना ओम वंगाटे यांची पोलीस कसोटी मिळाली होती. मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या रिमांड अर्जात डीसीपी सौरभ त्रिपाठीचे नाव फरार आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासूनच त्याच्यावर अटकेची तलवार असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचा तपास क्राइम इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) करत आहे.
तक्रार मागे घेण्यास सांगितले