मुंबई - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध पोलिसांनी आज ( 8 मे ) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले ( mumbai police filed chargesheet against rana couple ) आहे. मुंबई पोलिसांनी ८५ पानी आरोपपत्रात २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम ३५३ आणि ३४ अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
नवनीत राणा आणि रवी राणांच्या वतीने वकील धर्मेंद्र कुबेर हे न्यायालयात हजर राहिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना धर्मेंद्र कुबेर यांनी म्हटलं की, आज पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आज दोघांनाही कोर्टात उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. पुढील सुनावणीची तारीख १६ जून निश्चित करण्यात आली आहे.