महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साकीनाका बलात्कार प्रकरणी 346 पानांचे दोषारोपत्र दाखल - साकीनाका बलात्कार प्रकरण कारवाई

साकीनाका बलात्कार प्रकरणात दोषारोपत्र दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी 77 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपी विरोधात अट्रोसिटी अॅक्ट, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून दोषारोपत्र दाखल करण्यात आलेला आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावे, अशी विविध राजकीय पक्षांनी मागणी केली होती. तसेच या प्रकरणी योग्य ती कारवाई करून महिलांना आणि न्याय मिळवून देऊ असे सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आले होते.

साकीनाका बलात्कार प्रकरणी 346 पानांचे दोषारोपत्र दाखल
साकीनाका बलात्कार प्रकरणी 346 पानांचे दोषारोपत्र दाखल

By

Published : Sep 29, 2021, 7:06 AM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका परिसरात बलात्काराचे एक प्रकरण घडले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला होता. आता सकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी 18 दिवसामध्ये आरोपीविरोधात दोषारोपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी सर्व पुरावे एकत्र करून मंगळवारी दिंडोशी न्यायालयात 346 पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे. साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर तिच्यासोबत अमानवीय प्रकार केला गेला. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उ़डाली होती.

साकीनाका बलात्कार प्रकरणात दोषारोपत्र दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी 77 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपी विरोधात अट्रोसिटी अॅक्ट, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून दोषारोपत्र दाखल करण्यात आलेला आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावे, अशी विविध राजकीय पक्षांनी मागणी केली होती. तसेच या प्रकरणी योग्य ती कारवाई करून महिलांना आणि न्याय मिळवून देऊ असे सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आले होते. त्यात मुंबई पोलिसांनी आता याप्रकरणी 18 दिवसातच दोषारोपपत्र दाखल केले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे 10 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक महिला जखमी अवस्थेत आढळून आली होती. महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिच्यासोबत विकृत कृत्य करून तिच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडित महिलेचा राजावाडी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाने राज्यात महिलांच्या सुरक्षेवरून संतापाची लाट उमटली होती.

एका आरोपीला अटक

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा तपास पोलीस करत होते. त्यानंतर 18 दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणी दोषारोपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा - ..तर शिवाजी महाराजांनी यांना ढकलून दिले असते, चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हेही वाचा - अंधार-निर्जनस्थळी गस्त वाढवा; मुंबापुरीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details