महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Covid Restriction : मुंबईत कलम 144 मध्ये 15 जानेवारीपर्यंत वाढ - Mumbai Police Extend Covid Restrictions

मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली ( Mumbai Corona And Omicron Cases Increased ) आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानूसार आता 15 जानेवारी पर्यंत कलम 144 मध्ये वाढ करण्यात आली आहे.

mumbai police
mumbai police

By

Published : Dec 31, 2021, 4:42 PM IST

मुंबई :कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत ( Mumbai Corona And Omicron Cases Increased ) आहे. त्याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी 7 जानेवारी पर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेले कलम 144 ची मुदत 15 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, नवीन वर्षांच्या स्वागतासाठी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब्स, रिसॉर्ट्स आणि क्लब मध्ये एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी नवीन नियमावली जाहीर करत निर्बंधात वाढ केली ( Mumbai Police Extend Covid Restrictions ) आहे. त्यानूसार मुंबईत आता संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक ठिकाणं, गार्डन किंवा रिकाम्या मैदानावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्रीच्या संचारबंदीतही वाढ करुन ती 15 जानेवारी 2022 पर्यंत केली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

गुरुवारी मुंबईत 3 हजार 761 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे उपचारधीन रुग्णांची संख्या 8 हजार 60 वरुन थेट 11 हजार 360 वर गेली आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 682 वरुन 505 दिवसांवर आला आहेत. दिलासा दायक बाब म्हणजे सातव्यांदा शून्य मृत्युची नोंद गुरुवारी केली गेली.

हेही वाचा -Sindhudurg District Bank Result : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जिल्हा बँकेवर वर्चस्व कायम; 11 जागांवर फुलले कमळ

ABOUT THE AUTHOR

...view details