मुंबई - कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई (gang giving fake covid certificate)क्राइम ब्रँच युनिट १० ची गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Police exposes gang giving) मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना, लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होती आणि त्याबदल्यात १५०० रुपये घेत असे.
दोन आरोपींना अटक
पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रँच युनिट दहाच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली. या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. (Mumbai Police exposes gang giving) पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर मशीन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.