महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Employees Agitation : वडापावची शक्कल पोलिसांच्या आली कामी; आंदोलक एसटी कर्मचारी ताब्यात - ST Employees Agitation

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर ( ST Employees attack on Silver oak ) एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी आझाद मैदानातून त्यांना बाहेर ( Mumbai Police detain ST Employees ) काढले. त्यामुळे सर्व कर्मचारी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा ( ST employes agitation at Azad Maidan ) प्रयत्न केला.

ST Employees Agitation
ST Employees Agitation

By

Published : Apr 9, 2022, 4:57 PM IST

मुंबई- गेल्या पाच महिन्यांपासून आझाद मैदानावर बसलेल्या ( Azad Maidan Goregaon ) कर्मचाऱ्यांनी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या आवारात ठिय्या मांडला. आंदोलन करते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत आंदोलनकर्त्याना वडापाव देणार असल्याचे सांगत रेल्वे स्थानक परिसर रिकामा केला. यावेळी कर्मचारी देखील पोलिसांसोबत भुकेपोटी बाहेर निघाले. वडापाव खाण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ( Police offer vada pav to ST Employees ) ताब्यात घेतले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर ( ST Employees attack on Silver oak ) एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी आझाद मैदानातून त्यांना बाहेर ( Mumbai Police detain ST Employees ) काढले. त्यामुळे सर्व कर्मचारी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा ( ST employes agitation at Azad Maidan ) प्रयत्न केला.

आंदोलक एसटी कर्मचारी ताब्यात

एसटी कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले-सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत, म्हणून पोलिसांनीदेखील नरमाईची भूमिका घेतली. पण, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू झालेला गोंधळ पोलिसांनी शांत करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कर्मचाऱ्यांना वडापाव मिळेल, सगळ्यांनी 18 नंबर फलाटावर चला असे आश्वासन दिले. सर्व कर्मचाऱ्यांना बाजूला घेऊन गेले. तेच वडापाव खाण्यासाठी कर्मचारी 18 क्रमांक फलाटाकडे निघाले आणि पोलिसांच्या आयते जाळ्यात सापडले.

वडापावची हाव अंगलट ( How Police arrest ST Employees ) - वडापावची ऑर्डर दिली आहे. तिकडे बसून मस्त खा. तिथे तुम्हाला व्यवस्थित बसता येईल, असे पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांना गनिमी काव्याने ताब्यात घेतले. कारण 18 नंबर फलाट मोकळे आहे. तिथे गाड्यांना पार्किंगसाठी मोही जागा आहे. कोणी पळून जाऊ शकत नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेणे सोपे झाले. यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वडापावची हाव अंगलट आल्याची चर्चा रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details