महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या 14 कोटींचे अमली पदार्थ नष्ट

मुंबई पोलिसांकडून ( Mumbai Police ) वेगवेगळ्या कारवाई, छापेमारीमध्ये जप्त केलेले आमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत 3 हजार 90 किलोग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 14 कोटी रुपये इतकी किंमत आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Dec 16, 2021, 7:44 PM IST

मुंबई- मुंबई पोलिसांकडून ( Mumbai Police ) वेगवेगळ्या कारवाई, छापेमारीमध्ये जप्त केलेले आमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत 3 हजार 90 किलोग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 14 कोटी रुपये इतकी किंमत आहे.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. ते त्या प्रकरणात खटला सुरू असेपर्यंत एकत्रीत जपून ठेवण्यात येतात. त्यानंतर जपून ठेवलेले अमली पदार्थ हे पोलीस आयुक्तांच्या परवानगीने ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या समक्ष जाळून नष्ट करण्यात येत असते.

3 हजार किलोंपेक्षा जास्त गांजा

या 3 हजार 90 किलोग्रॅम अमली पदार्थांमध्ये 3 हजार किलोपेक्षा जास्त गांजा, 84 किलो अँफेटामाईन, 159 ग्रॅम हेरॉइन, 3 किलो चरस आणि 24 ग्रॅम कोकेनचा समावेश आहे. यापूर्वीही फेब्रुवारी, 2021 मध्ये 670 किलोग्रॅम अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले होते.

बंदिस्त भट्टीत जाळण्यात आले अमली पदार्थ

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या परवानगीने हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे. अमली पदार्थ एका बंदिस्त भट्टीत जाळून नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलीस विभागाकडून देमध्यात आली आहे.

हे ही वाचा -Maharashtra SSC HSC Exam 2022 Schedule - इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 'या' आहेत तारखा

ABOUT THE AUTHOR

...view details