मुंबई -मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांचा मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद आहे. मुंबई पोलिसांकडून महानगर दंडाधिकारी न्यायालयात परमबीर सिंह यांच्या विरोधात नाँन बेलेबल वारंट काढण्याबाबत वकिलांचे न्यायालयात पत्र दिले आहे. महानगर न्यायालय यावर उद्या निर्णय देणार आहे. आतापर्यंत 2 नाँन बेलेबल वाँरंट परमवीर सिंग यांच्या विरोधात ठाणे आणि गोरेगाव या प्रकरणात काढण्यात आले आहे.
मरीन ड्राईव्ह खंडणी प्रकरण : परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करा, मुंबई पोलिसांची न्यायालयात मागणी - non-bailable warrant against Paramveer Singh
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांचा मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद आहे. मुंबई पोलिसांकडून महानगर दंडाधिकारी न्यायालयात परमबीर सिंह यांच्या विरोधात नाँन बेलेबल वारंट काढण्याबाबत वकिलांचे न्यायालयात पत्र दिले आहे. महानगर न्यायालय यावर उद्या निर्णय देणार आहे.
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केंद्रीय गुप्तचर संस्था सीआयडीने अटकेची कारवाई केले आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे.