महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पोलीस सायबर विभाग : अशी आहे सध्याची स्थिती - मुंबई पोलीस सायबर विभाग

सध्याच्या घडीला सायबर पोलीस ठाणे व मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या सायबर विभागांमध्ये सायबर विषयात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. या अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळेस तांत्रिक मदत देण्याचे काम सायबर विभागाकडून केले जात आहे. स्थानिक पोलीस स्टेशन असतील, गुन्हे शाखा असतील किंवा मुंबई पोलिसांच्या इतर शाखांमध्ये सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग भरवले जात आहेत.

Mumbai Police Cyber Department
मुंबई पोलीस सायबर विभाग : अशी आहे सध्याची स्थिती

By

Published : Dec 15, 2020, 7:52 AM IST

मुंबई - सध्याच्या बदलत्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकजण हा सतत सायबर विश्वात वावरत असतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये सर्वाधिक सायबर हल्ले होत असल्याचेही समोर आले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून काम केले जात आहे.

मुंबई पोलीस सायबर विभाग

सायबर गुन्हे रोखण्यासाठी २००९मध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना -

सायबर हल्ले व सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ९ एप्रिल २००९ रोजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी २००८च्या कायद्यानुसार काम सुरू करण्यात आले होते. आजच्या घडीला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तपास केला जात आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल येथे एका विशेष सायबर पोलिस ठाण्याची स्थापना २००९मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत तब्बल ९४ पोलीस ठाण्यामध्ये एका विशेष सायबर विभाग उघडण्यात आले आहे.

सायबर विभागातील अधिकाऱ्यांना मिळत आहे योग्य प्रशिक्षण -

सध्याच्या घडीला सायबर पोलीस ठाणे व मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या सायबर विभागांमध्ये सायबर विषयात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. या अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळेस तांत्रिक मदत देण्याचे काम सायबर विभागाकडून केले जात आहे. स्थानिक पोलीस स्टेशन असतील, गुन्हे शाखा असतील किंवा मुंबई पोलिसांच्या इतर शाखांमध्ये सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग भरवले जात आहेत. सायबर गुन्हेगारी विषयांमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रकार हे रोजच वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येत असतात. अशा घडणाऱ्या वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात प्रशिक्षण वर्ग हे सायबर पोलिसांना देण्याचे काम सतत केले जात आहे. प्रत्येक तीन महिन्याच्या अंतराने सायबर विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन या संदर्भात योग्य ती माहिती दिली जात आहे.

यंदाच्या वर्षात घडलेले सायबर गुन्हे -

मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी केलेल्या वर्षभरातल्या कामगिरीवर जर प्रकाश टाकायचा झाला तर २०२०या वर्षात मुंबई शहरात तब्बल २२१६ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत १५८ सायबर गुन्ह्याचा तपास लागलेला आहे. हेच प्रमाण २०१९मध्ये २२२५ होते. यात २८४ गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला होण्याचे १३ गुन्हे या वर्षामध्ये नोंदविण्यात आलेले आहेत. तर हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात २८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. अश्लील एसएमएस ,ईमेल , एमएमएसच्या संदर्भात २१५ गुन्हे, सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल बनवणे, मॉर्फ केलेले छायाचित्र पोस्ट करणे यांसारखे २८ गुन्हे, तर क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ५१५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. इतर प्रकरणात १४१६ गुन्ह्यांची नोंद आता पर्यंत झाली आहे.

पोलिसांना अजूनही आधुनिक प्रशिक्षणाची गरज - रितेश भाटिया

सायबर गुन्ह्यांचे एक्सपर्ट रितेश भाटिया यांच्या मतानुसार देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात घडणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागातील पोलिस कर्मचाऱ्यांना अजून मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स ट्रेनिंगची गरज आहे. ज्याप्रकारे डिजिटल माध्यम बदलत आहे त्याप्रकारे सायबर गुन्हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारातून घडत आहेत. अशा वेळेस पोलीस खात्याकडून सायबर संदर्भात तज्ञ असलेल्या खासगी व्यक्तींची मदत घेतली गेली पाहिजे असे रितेश भाटिया यांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया कंपनी व बँक यांच्याकडून पोलिसांना गरज पडल्यावर तात्‍काळ सहकार्य मिळत नसल्यामुळे बर्‍याच वेळा सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यास विलंब होत असल्याचाही रितेश भाटिया यांनी म्हटल आहे. यामुळे सायबर पोलिसांसोबत एक चांगली भागीदारी सोशल मीडिया कंपनी, बँक व संबंधित विभागांची असायला हवी, असेही भाटिया यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -क्रिकेटपटू ख्रिस लिन आणि डॅन लॉरेन्सची होणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details