महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांनी 9 व्या आरोपीला पवईतून केली अटक - टीआरपी घोटाळा मुंबई

मुंबई पोलिसांनी काही वृत्त वाहिन्यांकडून टीआरपी घोटाळा केल्याचे उघडकीस आणले होते. या प्रकरणी पोलिसांनी आता नवव्या आरोपीला पवईमधून अटक केली आहे. तसेच मुंबई पोलिसांची वारंवार बदनामी करणाऱ्या वृत्त वाहिनीतील २ जणांनाही मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

television rating points news
मुंबई पोलिसांनी 9 व्या आरोपीला पवईतून केली अटक

By

Published : Oct 24, 2020, 9:27 AM IST

मुंबई- मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणल्यानंतर यासंदर्भात एका विशेष पथकाकडून तपास केला जात आहे. टीआरपी घोटाळ्या संदर्भात 9 व्या आरोपीला शहरातील पवई परिसरातून अटक करण्यात आली आहे. हरीश पाटील असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हरीश पाटील यांच्या नावावर सात कंपन्यांची नोंद असून त्यातील एका वाहिनीचे आर्थिक व्यवहार या कंपनीच्या माध्यमातून झाल्याचे समोर आलेले आहे. मात्र , या कंपनीचा पत्ता ज्या ठिकाणी देण्यात आला आहे त्या ठिकाणी ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे ही पोलिस तपासात समोर आलेला आहे.

मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात असताना रिपब्लिक न्यूज नेटवर्कच्या चीफ फायनान्शिअल ऑफिसर शिवा सुंदरम व डिस्ट्रीब्यूटर विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आलेली आहे. या चौकशीदरम्यान त्यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना या संदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे द्यावी लागलेली आहेत. शिवा सुंदरम व घनश्याम सिंग यांना पुन्हा चौकशीसाठी गरज पडल्यास बोलावले जाईल, असे सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details