सचिन वाझे आता मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या कस्टडीत, पोलीस वाझेला घेऊन तळोजावरुन निघाले - undefined
मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात सोमवारी सचिन वाझेला तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले असून पोलीस सचिन वाझेला घेऊन तळोजावरुन निघाले आहेत.
मुंबई- मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात सोमवारी सचिन वाझेला तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले असून पोलीस सचिन वाझेला घेऊन तळोजावरुन निघाले आहेत.
सचिन वाझे याला मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यलयात अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून सचिन वाझेची पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. गुन्हे शाखा कक्ष ११ कडे गोरेगाव येथील हॉटेल व्यवसायिकाकडे खंडणीचा तपास देण्यात आला आहे. या गुन्हयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाजेसह काही अधिकारी आणि खाजगी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
मुंबई गुन्हे शाखेने सचिन वाझेचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने हा अर्ज मान्य करुन कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सचिन वाझेंच्या प्रकृतीबाबतची माहिती मागवली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेला अटक केल्यानंतर त्याला तळोजा कारागृहातील वैद्यकीय वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर ह्रदयाची शस्रक्रिया देखील करण्यात आली. कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सचिन वाझे प्रवास करू शकतो अशी माहिती दिल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी सचिन वाझेची कस्टडी गुन्हे शाखेकडे देण्यास समंती दिली. त्यानुसार आज १ नोव्हेंबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने सचिन वाझेची कस्टडी घेतली आहे.
गोरेगाव येथील एका हॉटेल व्यावसायिकाने परमबीर सिंह,सचिन वाझे आणि इतर आरोपींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपवण्यात आला होता. सचिन वाझेचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यात यासाठी एनआयएच्या विशेष न्यायलयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी या संबंधी सुनावणी झाली. यात कारागृह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सचिन वाझे प्रवास करू शकतात असा अहवाल सादर केल्यानंतर सचिन वाझेचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यासाठी संमती देण्यात आली.Conclusion: