मुंबई -विदेशी कंपन्यांकडून ई-सिगारेट ही परवाना नसलेली उत्पादने भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. लोकांना धुम्रपान सोडण्यास मदत करतील या नावाखाली ही उत्पादने विकली जातात. ( Mumbai police ) परिणामी तरुणांमध्ये ई-सिगारेट वापरण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच्या वापरामुळे प्रत्यक्षात फायद्या पेक्षा तोटाच जास्त आहे.
पोलीसांची 12 वेगवेगळी पथके तयार - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून मुंबई मधील ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारावे कारवाई केली. मुंबईमधील विविध ठिकाणी ई सिगारेटचा साठा व विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीची शहानिशा करून पुढील तपासासाठी पोलीसांची 12 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.