मुंबई - ग्राहकांना झटपट खाद्यपदार्थ पोहचवण्यासाठी कंपन्यांची चढाओढ असते. यातून डिलिव्हरी बॉयकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर डिलिव्हरी बॉयना नियुक्त करताना त्यांची चारित्र्य पडताळणी ( Character certification delivery boys Mumbai CP ) करावी. तसेच, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि गणवेश देण्यात यावा, असे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला ( Sanjay Pandey Warns Delivery Boys ) आहे.
...अन्यथा डिलिव्हरी बॉयसह कंपनीवर कारवाई
अनेकदा लूटमारीच्या घटना घडल्यामुळे डिलिव्हरी बॉय आणि संबंधित कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे मैदानात उतरले आहेत. रविवारी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना त्यांनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवरून भाष्य केले आहे. यामध्ये वाहतूक ध्वनिप्रदूषण तसेच बेशिस्तपणे गाडी चालवणारे डिलिव्हरी बॉय संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. पांडे म्हणाले की, 'माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत. यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले अथवा विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळल्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबंधित कंपनीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.'
'या'बाबात कंपनीने दक्षता घ्यावी