मुंबई -माजी मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) प्रकरणात सीबीआयने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांची शुक्रवारी ( दि11 ) सीबीआय कार्यालयात ( CBI ) चौकशी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात तक्रारदारावर दबाव टाकण्याच्या भूमिकेवरून संजय पांडे यांची 6 तास चौकशी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
पांडे यांनी परमबीर सिंह यांना तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. ज्याची तक्रार स्वत: सिंह यांनीही केली होती. सीबीआय कथित पोलीस बदली पोस्टिंग प्रकरणाचा तपास करत असून ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोपी आहेत. अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रींग बेनामी संपत्तीसह कथित पोलीस बदल्यांच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेले देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपाअंतर्गत चौकशी सुरू आहे. 1 नोव्हेंबरला ईडीने देशमुखांना अटक केली आणि कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.