महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोशल माध्यमांवरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये - मुंबई पोलीस आयुक्त

रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबईत कलम 144 लागू राहणार.. मुंबईतील नागरिकांनी सोशल माध्यमांवर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचे आवाहन..

By

Published : Nov 9, 2019, 3:30 PM IST

संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई -अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरामध्ये कलम 144 लागू केलेला आहे. या दरम्यान मुंबईतील नागरिकांनी सोशल माध्यमांवर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी केले आहे.

सोशल माध्यमांवरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन

हेही वाचा... शिवसेना भवनाजवळील पोलीस बंदोबस्तात वाढ, अयोध्या निकालावरून मुंबई पोलीस सतर्क

मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कलम 144 लागू करण्यात आलेले असून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ते लागू राहणार आहे. अयोध्या बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यावस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा... 'अयोध्या' प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

ABOUT THE AUTHOR

...view details