मुंबई : राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षाची परिस्थिती अस्थिर ( Political crisis in Maharashtra ) झालेली असतानाचा मुंबई पोलिस आयुक्तपदी विवेक फणसळकर ( Vivek Phansalkar as Mumbai Police Commissioner ) यांची राज्य सरकारकडून आज नियुक्ती झाली आहे. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्या 30 जून रोजी निवृत्त होणार ( Police Commissioner Sanjay Pandey will Retire ) असल्याने त्यांच्याजागी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय : विवेक फणसळकर हे भाजप नेते माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे फणसळकर यांची नियुक्ती विद्यमान महाविकास आघाडी सरकारने केली आहे की, गृहविभागाने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे हे मात्र कळू शकलेले नाही. 1989 च्या आयपीएस कॅडरचे अधिकारी असलेले फणसळकर यांनी यापूर्वी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त ठाणे पोलीस आयुक्त तर आता महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड या पोलीस विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस आयुक्तपदी नियुक्ती : 1986 च्या बॅचचे संजय पांडे हे निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेप्रमाणे 1987 च्या बॅचचे हेमंत नगराळे हे वरिष्ठ अधिकारी आहेत. मात्र, नगराळे यांनी यापूर्वी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त या दोन्ही पदावर काम केल्याने त्यांची निवृत्ती अशक्य होती. तर 1988 च्या बॅचचे रजनीश शेठ हे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. तर 1988 च्या बॅचच्या रश्मी शुक्ला या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे या तिघांचाही मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी विचार करण्यात आलेला नाही, असे गृह विभागातील सूत्राने सांगितले. त्यामुळे 1989 च्या बॅचचे फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, ते गुरुवारी संजय पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
फणसळकर यांच्याच नावावर शिकामोर्तब : फणसळकर यांच्याप्रमाणेच 1989 च्या बॅचचे भूषण कुमार उपाध्याय हे होमगार्डचे महासंचालक आहेत. तर 1989 च्या बॅचचे संदीप बिश्नोई आणि प्रज्ञा सदावर्ते या अतिरिक्त पोलीस महासंचालक असल्याने त्यांच्या नावाचा विचार झालेला नाही. सध्या राज्य सरकारच्या विरोधात बहुमत चाचणी उद्या गुरुवार सकाळी 11 वाजता विधिमंडळात केली जाणार असल्याने राज्याच्या गृहविभागाने विवेक फणसळकर यांच्या नावाने शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती झाली आहे. संजय पांडे 30 जून रोजी रिटायर असल्याने त्यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा :Sworn in ceremony : देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा 1 जुलैला होणार शपथविधी, सुत्रांची माहिती