मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीआयची टीम मुंबईत तपासासाठी येणार आहे. मुंबई महापालिकेने अगोदरच जे अधिकारी येणार आहेत, त्यांनी महापालिकेला कळवणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. यावरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी महापालिका अधिकारी आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी, सीबीआयचे अधिकारी मुंबईत तपासासाठी येतील तेव्हा यावेळी मुंबई पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्त हे मुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव असल्यासारखे वागणार नाहीत, अशी अपेक्षा करतो. तसेच सीबीआयला तपासात सहकार्य करा, असे म्हटले आहे.