महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Pandey On Unauthorized Peddlers : मुंबई पोलीस आयुक्तांच्या रडारवर अनधिकृत फेरीवाले, लवकरच कारवाई करण्याचे संकेत - मुंबई पोलीस आयुक्तांच्या रडारवर अनधिकृत फेरीवाले

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai police Commissioner Sanjay Pandey ) यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईकरांच्या सोयीसुविधा करीता वेगवेगळे नियम संजय पांडे यांनी केले ( Sanjay Pandey On Unauthorized Peddlers ) आहे. आता संजय पांडे यांनी मुंबईकरांना करीता आवश्यक असलेले महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. ते म्हणजे मुंबईतील उत्पादकांवर होणारे फेरीवाल्यांची गर्दी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनधिकृत असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहे.

Mumbai police Commissioner Sanjay Pandey
मुंबई आयुक्त संजय पांडे

By

Published : May 30, 2022, 7:14 PM IST

मुंबई -मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईकरांच्या सोयीसुविधा करीता वेगवेगळे नियम संजय पांडे यांनी केले ( Sanjay Pandey On Unauthorized Peddlers ) आहे. आता संजय पांडे यांनी मुंबईकरांना करीता आवश्यक असलेले महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. ते म्हणजे मुंबईतील उत्पादकांवर होणारे फेरीवाल्यांची गर्दी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनधिकृत असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहे. यासंदर्भात लवकरच पालिका आयुक्त यांच्याशी देखील भेट घेणार आहे.

फेसबुक लाईव्हद्वारे मुंबईकरांना दिली माहिती - संजय पांडे यांनी आपला आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून मुंबईकरांचा करिता वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनिप्रदूषण, जेष्ठ नागरिकांकरिता विशेष सुविधा, पासपोर्ट व्हेरिफिकेशन घरपोच, गृहनिर्माण तक्रारी करता विशेष कक्षाची स्थापना या पाठोपाठ आता फेरीवाल्यांच्या संदर्भात देखील संजय पांडे यांनी आता पुढाकार घेतला. यासंदर्भात संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे मुंबईकरांना माहिती दिली आहे.

योग्य जागा ठरवून देणार - रेल्वे स्थानकाबाहेर 150 मीटर तर शाळेच्या 100 मीटर परिसरात असलेल्या फेरीवाल्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले. तसेच अधिकृत फेरीवाल्यांबाबत योग्य नियोजन करत त्यांची जागा ठरवून देण्याबाबतही पालिकेसोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे.

पोलीस आयुक्तांचे आवाहन - शाळा, मंदिर याठिकाणी 100 मीटरच्या अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बंदी आहे. तर रेल्वे स्थानकाबाहेर 150 मीटरच्या अंतरापर्यंत ते कशाचीही विक्री करू शकत नाहीत. लवकरच शाळाही सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने शाळा आणि रेल्वे स्थानकाबाहेर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत कारवाईचा वेग वाढणार आहे. तसेच सोसायटीतील रहिवाशांवर नियमबाह्य कारवाई करू नका, असे आवाहनही आयुक्तांनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील सदस्यांना केले आहे.

फेरीवाल्याला ओळखपत्र देऊन विक्रीसाठी परवानगी देणार - अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय काही फेरीवाल्यांना पोलीस पालिकेच्या कारवाईच्या भीतीने सुरू असलेल्या वसुलीचाही फटका बसत असल्याचे समोर येत आहे. बऱ्याच ठिकाणी गुंडाकडून परस्पर रस्त्यावरची जागा विकून त्याठिकाणी फेरीवाले बसत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयुक्तांनी खंडणीविरोधी पथकाकडे दिली आहे. तर दुसरीकडे या विक्रेत्यांसाठी झोन ठरवून त्यांना ओळखपत्र देऊन कायदेशीररीत्या विक्रीसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. अधिकृत विक्रेता समितीद्वारे यावर नियोजन राहू शकते असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.

हेही वाचा -Piyush Goyal Filed Rajya Sabha Nomination : शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - पियूष गोयल

ABOUT THE AUTHOR

...view details