महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत थ्री स्टार हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा, दोन मॉडेल तरुणीची सुटका - मुंबई पोलिसांनी केली दोन तरुणींची सुटका

मुंबईतील बिअरबार, पब, जुगाराचे अड्डे व इतर ठिकाणी ग्राहकांना अमलीपदार्थांची विक्री या महिला टोळीच्या माध्यमातून केली जात असल्याचे समोर आले आहे. या बरोबरच अमलीपदार्थ विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून शरीर सुखाची मागणी केल्यानंतर ही टोळी सेक्स रॅकेटच्या माध्यमातून काम करत असल्याचेही समोर आले आहे.

वेश्या व्यवसायावर छापा, दोन मॉडेल तरुणीची सुटका
वेश्या व्यवसायावर छापा, दोन मॉडेल तरुणीची सुटका

By

Published : May 27, 2021, 11:48 AM IST

मुंबई- लॉकडाऊन काळातही वेश्याव्यवसाय सर्रासपणे सुरुच आहेत. त्यामुळे याविरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे मंगळवारी रात्री मुंबईतील ग्रँड रोड परिसरामध्ये एका थ्री स्टार हॉटेलवर छापा मारण्यात आला. या कारवाईत 2 मॉडेल तरुणींची वेश्‍या व्यवसायातून सुटका करण्यात आलेली आहे.


लॉकडाऊन दरम्यान चालवली जात आहे महिलांची टोळी-

कोरोना संक्रमनमुळे शहरात लॉक डाऊनचे नियम लागू करण्यात आल्यानंतर एकंदरीत सर्वच गोष्टींवर मर्यादा आल्यामुळे मुंबई शहरात छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय व अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा समोर आलेल आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या महिला अमलीपदार्थ तस्कर ईकरा कुरेशी हिच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय व अमलीपदार्थ तस्करीसाठी 8 ते 10 जणांची टोळी मुंबई व मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सतर्क होती. मुंबईतील बिअरबार, पब, जुगाराचे अड्डे व इतर ठिकाणी ग्राहकांना अमलीपदार्थांची विक्री या महिला टोळीच्या माध्यमातून केली जात असल्याचे समोर आले आहे. या बरोबरच अमलीपदार्थ विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून शरीर सुखाची मागणी केल्यानंतर ही टोळी सेक्स रॅकेटच्या माध्यमातून काम करत असल्याचेही समोर आले आहे.

समाजसेवा शाखेकडून कडून कारवाई

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून अशा प्रकारच्या गोष्टींवर अंकुश बसवण्यासाठी कारवाई केली जाते. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021या चार महिन्यांच्या दरम्यान सहा गुन्हे हे वेश्याव्यवसाय संदर्भात नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत 9 महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आलेली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना गेल्या 4 महिन्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details