मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या इम्पोर्टेड tocilizumab injection, actemra 400 mg औषधांची त्यावर छापील किमतीपेक्षा तीन पट अधिक दराने विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 9 अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही औषधे बनावट असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी या आरोपीकडून तब्बल पंधरा इम्पोर्टेड इंजेक्शन्स आणि गोळ्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेली इंजेक्शन दिल्ली येथून मुंबईत पाठवण्यात आलेली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने नवी दिल्ली येथे जाऊन त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून ही मूळ (ओरिजनल) इंजेक्शन्स 58 हजार रुपयांना विकत घेतली होती, असे समजले आहे.
हेही वाचा -कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मोठी आग...अग्निशमन दलाच्या तत्परतेने परिस्थिती आटोक्यात