मुंबई - मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानातील नंबरवरून काल रात्री ११. ४५ वाजता वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला. त्यानंतर याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. Suspicious Call To Mumbai Police आता मुंबई पोलिसांनी विरार येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
नंबर यूपी एटीएसचा मात्र, धमकी देणाऱ्याने WhatsAppवर एकूण सात क्रमांक देखील वाहतूक नियंत्रण कक्षास शेअर केले आहेत. त्यापैकी एक नंबर हा उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे. ईटीव्ही भारतने९४५४४००६५० या क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे. या नंबरवरील व्यक्तीने हा नंबर यूपी एटीएसचा असून इंटरनेटवर हा नंबर उपलब्ध असल्याचे सांगितले.