मुंबई -मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police ) अमली पदार्थ विरोधी कक्षच्या आझाद मैदान पथकाने ( Azad Maidan ) मस्जिद बंदर ( Masjid Bandar Area) परिसरातून एका नायजेरियन व्यक्तीकडून ( Nigerian Person ) 110 ग्रॅम कोकेन ( Drugs) जप्त केले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 33 लाख रुपये आहे.
बोयेगा हबीब अबुबकर (वय 47 वर्षे), असे अटक ( Mumbai Police Arrested a Nigerian Person ) करण्यात आलेल्या व्यक्तीने नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो पालघर ( Palghar ) येथे एका घरात राहतो. कपडे विकण्याच्या नावाखाली तो अमली पदार्थाची तस्करी करत होते. नववर्षाच्या ( New Year 2022 ) स्वागतासाठी साजरा होणाऱ्या मेळाव्यासाठी या अमली पदार्थाची तस्करी होत होती, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.