मुंबई - मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6 किलो 560 ग्रॅम चरससह एका आरोपीला अटक केली ( Mumbai Police Arrested Drug Smuggler ) आहे. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 95 लाख रुपये आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विजय चौहान असे अटक आरोपीचे नाव असून तो ३२ वर्षांचा असून, तो मुंबईतील मालवणी येथे राहतो. पोलिसांनी सांगितले की, आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूर येथून चरसचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आला आहे. याबाबतची माहिती मिळताच दहिसर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून चेक नाक्याजवळ चरससह आरोपीला रंगेहाथ अटक केली.