मुंबई-सोशल माध्यमासाठी अश्लील प्रँक व्हिडिओ बनविणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.सोशल माध्यमांवर मुलींचे अश्लील प्रँक व्हिडीओ बनवून केवळ 4 महिन्यांत 2 कोटी रुपये कमावणाऱ्या तीन जणांच्या युट्युबर टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश गुप्ता , प्रिन्स राजू व जितेंद्र गुप्ता अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सोशल माध्यमांवर अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी ही टोळी काही मुलींना सोबत घेऊन त्यांच्या नकळत अश्लील व्हिडिओ बनवत होती. यानंतर हे अश्लील प्रँन्क व्हिडीओ सोशल माध्यमांवर अपलोड करीत होते. युनायटेड स्टुडंट असोसिएशनचे सचिव फैजल शेख या व्यक्तीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास केला. या तपासादरम्यान अश्लील प्रँक व्हिडीओ बनवणारी युट्युबर टोळी समोर आलेली आहे. कॉलेजात जाणार्या तरुण मुलींना संपर्क साधून त्यांना पॉकेटमनीचे आमिष दाखवून हे आरोपी व्हिडिओ बनवित होते. सोशल माध्यमांवरील फेसबुक, यूट्यूबसारखे माध्यमांवर व्हिडिओ अपलोड करून केवळ 4 महिन्यांत या टोळीने 2 कोटी रुपये कमविल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे की, काही मुली केवळ पॉकेटमनीसाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी सहमती दर्शवत होत्या.।
हेही वाचा-पुणे पोलिसांनी जप्त केलेली ३० पेक्षा अधिक वाहने जळून खाक..!