मुंबई - सुशांतसिंह प्रकरणी मुंबई पोलिसांवर टीका होत असताना सुशांतसिंहची एकेकाळी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या दिशा सालीयन प्रकरणी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले आहे.
दिशा सालीयन प्रकरणी जर कोणाला काही माहीत असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
मुंबई पोलिसांचे आवाहन
दिशा सालीयन हिच्या मृत्यूची नोंद मालवणी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा सर्व बाजूंनी तपास लावण्यात येत आहे. यासंदर्भात सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यातून विविध माहिती समोर येत आहे. याबाबत कोणीही काही माहिती देऊ इच्छित असाल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरून तपास अधिक सखोल करता येईल.
खालील पत्त्यांवर माहिती पाठवू शकता किंवा कॉल करू शकता -
अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई.
दूरध्वनी क्रमांक ०२२ २८८५४६२५
ईमेल -- cp.mum.addcp.north@mahapolice.gov.in
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-११, मुंबई.
दूरध्वनी क्रमांक ०२२ २८९०३८९९
ईमेल -- dcpzonel l-mum@mahapolice.gov.in
सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, मुंबई.
दूरध्वनी क्रमांक ०२२ २८८२०४९७
ईमेल -- acpmalad@gmail.com
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे, मुंबई.
दूरध्वनी क्रमांक ०२२ २८८२१३१९
ईमेल -- ps.malvani.mum@mahapolice.gov.in