मुंबई -बोरीवलीत अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 1 किलो हेरॉईन जप्त ( Mumbai Narcotic Cell Action Drug Peddler ) केले आहे. हा तस्कर राजस्थानमधील असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान युनिट 1 च्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात ( Mumbai Police Unit One ) आली. जप्त करण्यात आलेल्या 1 किलो हेरॉईनची बाजारात किंमत 3 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी केले 3 कोटींचे हेरॉईन जप्त, एकास अटक - मुंबई पोलीस युनिट एकची कारवाई
मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील एका व्यक्तीकडून 3 कोटींचे हेरॉईन जप्त ( Mumbai Police Arrested Drug Peddler ) केले आहे. 3 कोटी रुपये याची किंमत आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

प्यारे अमानुल्ला खान ( वय. 65, राजस्थान ) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 3 कोटी रूपयांचे 1 किलो हेरॉईन जप्त केले आहे. प्यारे अमानुल्ला खानवर एनडीपीएस अॅक्ट अंंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला न्यायालयाने 19 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांना मुंबई परिसरात हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येत असल्याची खबर मिळाली. त्याप्रमाणे बोरीवली पूर्व मुंबई परिसरात आझाद मैदान युनिटचे पोलीस पथकाने सापळा लावला होता. तेव्हा राजस्थानचा रहिवाशी असणारा प्यारे अमनउल्ला खान याला अटक करण्यात आली. त्याच्यकडून पोलिसांनी 1 किलोग्रॅम हेरॉईन जप्त केली. आरोपीवर कलम 8 (क) सह 21 (क) एन्. डी. पी. एस्. अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या गुन्हातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर म्हणाले, "पुढील काही दिवस..."