मुंबई -मुंबई पोलीस क्राइम ब्रँचच्या युनिट एकने ( Mumbai Police Crime Branch ) ॲण्टॉप हिल परिसरातून 16 कोटी रुपयांच्या मेथॅक्युलॉनचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. याप्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली ( Mumbai Police Arrested 3 With Drug ) असून, त्यांच्याकडून 16 किलो 100 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज ( Mumbai Police 16 Crore Drug Worth ) जप्त केले आहे.
बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ॲण्टॉप हिल भागात तीन तरुण आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या बॅगेत 16 किलो शंभर ग्रॅम वजनाचे मेथॅक्युलॉन नावाचे ड्रग्ज आढळून आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 16 कोटी 10 लाख रुपये आहे.