मुंबई - सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.
लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर
हार्बर मार्गावर रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर करत आहेत. अचानक प्रवासी संख्या वाढल्याने मोनो रेल्वेच्या तिकिटांसाठी मोठी गर्दी मोनो रेल्वे स्थानकांमध्ये पहायला मिळत आहे.
हेही वाचा - मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात आज सर्वाधिक पावसाची नोंद
सध्या बिघाड झालेल्या मोनो रेल्वेच्या संख्येत वाढ झाल्यामुळे 22 मिनिटांच्या अंतराने धावणारी मोनो रेल्वे ही जवळपास 40 ते 45 मिनिटांच्या अंतराने धावत होती. मोनोच्या ताब्यात फक्त तीन मोनो रेल्वेच कार्यरत असून इतर मोनोच्या डब्यांची दुरुस्ती सुरू आहे, याचा परिणाम मोनो रेल्वेच्या सेवेवर दिसून आला.