महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उत्तर-मध्य मुंबईचा गड भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला

आता या लोकसभा निवडणुकीत हा गड काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त परत मिळवणार का? याचा निकाल आज लागणार आहे.

उत्तर-मध्य मुंबईचा गड काँग्रेस पुन्हा खेचून आणणार का?

By

Published : May 23, 2019, 6:01 AM IST

Updated : May 23, 2019, 6:02 PM IST

मुंबई- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झाली असून भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. इथे खरी लढत पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यामध्येच होती. तर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजरिया यांनी क्रमांक ३ नंबरची मतं घेतली.

LIVE :
वेळ -

  • 5.38 - 24 व्या फेरीत पूनम महाजन 477765, प्रिया दत्त - 3551801
  • 5.21 - २० व्या फेरीत पूनम महाजन 456714, प्रिया दत्त 330696
  • 4.30 - १९ व्या फेरीत पूनम महाजन 445841, प्रिया दत्त - 316699
  • 2.55 - पूनम महाजन - 307928, प्रिया दत्त - 159903, अंजारीया - 22510
  • 2.55 - अकराव्या फेरीत पूनम महाजन यांना दीड लाखांची आघाडी
  • 2.37 - नववी फेरी - पूनम महाजन - 332826, प्रिया दत्त - 201098
  • 2.18 - आठवी फेरी - पूनम महाजन (भाजप) - 225220, प्रिया दत्त (काँग्रेस) - 117568, हेमान अंजरिया (वंचित) 16046
  • 1.37 - पूनम महाजन (भाजप) - 2,41,546, प्रिया दत्त (काँग्रेस) 1,10,218
  • 1.00 - पूनम महाजन (भाजप) - 179559, प्रिया दत्त (काँग्रेस) 100980
  • 12.23 - पाचवी फेरी - पूनम महाजन (भाजप) - 130995, प्रिया दत्त (काँग्रेस) - 77979, हेमान अंजरिया (वंचित) 10151
  • 12.20 - पूनम महाजन (भाजप) - 141463, प्रिया दत्त (काँग्रेस) - 81185
  • 11.36 - पूनम महाजन (भाजप) - 76316, प्रिया दत्त (काँग्रेस) - 46979, हेमान अंजरिया (वंचित) 6274
  • 10.51 - दुसरी फेरी - पूनम महाजन (भाजप) - 50930, प्रिया दत्त (काँग्रेस) - 29212, हेमान अंजरिया (वंचित) 4799
  • 10.38 - पूनम महाजन (भाजप) - 51480. प्रिया दत्त (काँग्रेस) - 28441
  • 9.48 - प्रिया दत्त - 10530, पूनम महाजन 18593, रहेमान अंजरिया (वंचित) 2065
  • 9.44 - पूनम महाजन पहिल्या फेरित ८५० मतांनी आघाडीवर
  • 8.02 - पूनम महाजन आघाडीवर
  • ८ - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
    भाजपच्या पूनम महाजन ६० हजार मतांनी आघाडीवर

मुंबईत असलेल्या ६ लोकसभा मतदारसंघात मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा गड मानला जात होता. याच मतदारसंघातून आतापर्यंत ४ वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेचे मनोहर जोशी यांना लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यासाठी हाच मतदारसंघ महत्वाचा ठरला. त्यापूर्वी सेनेचे नारायण आठवले, विद्याधर गोखले हेही याच मतदार संघातून निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये पूनम महाजन यांनी मुंबई उत्तर-मध्यचा हा गड प्रिया दत्त यांच्याकडून हिरावून घेतला होता.


प्रिया दत्त आणि पूनम महाजन या दोन्ही लोकसभा उमेदवारांना एक राजकीय परंपरा आहे. पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहे. त्यामुळे त्यांच्या मागे भाजपचे एक मोठे वलय आहे. तर प्रिया दत्त यांनासुद्धा काँग्रेसची एक मोठी परंपरा आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांच्या त्या कन्या असून दत्त हा परिवार मागील अनेक दशकांपासून काँग्रेस सोबत राहिला आहे. त्यामुळेच यावेळीही काँग्रेसने स्थानिक कार्यकर्त्यांच्या या मताला डावलून पुन्हा एकदा प्रिया दत्त यांना संधी दिली आहे. तरीही या मतदारसंघाचे चित्र नेमके काय असेल हे मात्र निकाल समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

Last Updated : May 23, 2019, 6:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details