मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांना आज सक्त वसूली संचलनालय(ED) कडून पून्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. त्यांच्या सोबत राजन शिरोडकर यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.
उन्मेष जोशीसह राजन शिरोडकर चौकशीसाठी पुन्हा ईडी मुख्यालयात - कोहिनूर मिल प्रकरण
कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने या अगोदरही जोशी यांची सात तास चौकशी केली होती. मात्र आज त्यांना पून्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
कोहिनूर सीटीएनएल आर्थिक व्यवहारासंबंधी ईडी चौकशी सुरू आहे. यासाठी उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची सोमवारी मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे. या अगोदर 22 ऑगस्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा सुमारे 9 तास चौकशी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांना या प्रकरणासंदर्भात संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. सोमवारी उन्मेश जोशी व राजन शिरोडकर हे पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. कोहिनूर सीटीएनएल संदर्भात उन्मेष जोशी यांनी जी कागदपत्र ईडी कार्यालयात जमा केलेली आहेत, त्यासंदर्भात ही चौकशी होणार आहे, असे म्हटले जाते.
तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर