महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

११८ मुलींना परिवहन विभागात सामील करून घेणार - दिवाकर रावते - परिवहन मंत्री दिवाकर रावते

२०१४ मध्ये परीक्षा देऊन निवड झालेल्या ११८ मुलींना परिवहन विभागात सामील करून घेतले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

दिवाकर रावते

By

Published : Sep 13, 2019, 9:59 PM IST

मुंबई - राज्यात २०१४ मध्ये परिवहन विभागातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच सेवेत रूजू केले जाईल असे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

११८ मुलींना परिवहन विभागात सामील करून घेण्याची दिवाकर रावते यांची पत्रकार परिषदेत घोषणा

हेही वाचा... विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत संभ्रम, सूत्रांची माहिती

रावते यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे ;

  • 2014 मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलींची कोणतीही पून्हा कोणतीही परीक्षा न घेता, त्यांना संबंधीत आरक्षणानुसार सेवेत सामील केले जाईल.
  • लवकरच जाहिरात काढून ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत तेथे 118 मुलींना सेवेत समावेश केले जाईल

हेही वाचा... सदाभाऊ खोतांची महायुतीकडे 12 जागांची मागणी; 'हे' आहेत मतदारसंघ

परिवहन विभागात भरतीसाठी २०१४ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती, त्यापैकी ८३२ उमेदवारांची निवड झाली होती. मात्र त्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत कोर्टाने ४८ टक्के असलेल्या आरक्षणात ३३ टक्के आरक्षण दिले जाणार नाही, असे सांगत ११८ मुलींना डावलले होते. ८३२ उमेदवारांपैकी आतापर्यंत काही लोक इतर विभागात गेले असल्याने आता त्यांची जागा शिल्लक राहिली आहे, तर विभागात अजून ३०० जागा रिक्त असल्याने त्या ठिकाणी या ११८ जणांची परीक्षा न घेता, याच मुलींना परिवहन विभागात सामील करून घेतले जाईल, असे रावते यावेळी म्हणाले.

हेही वाचा... मेगाभरती सुरु होण्याआधीपासुनच बारामती लक्ष्य; खासदार गिरीश बापट

ABOUT THE AUTHOR

...view details