महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवई तलाव येथे सेल्फी पॉईंट; स्थानिक आमदार नसीम खान यांचा स्तुत्य उपक्रम - आमदार नसीम खान news

मुंबई पूर्व उपनगरातील पवई तलावावर मोठ्या संख्येने पर्यटक व नागरिक येत असतात. तलाव परिसरात फोटो घेतात. यामुळे आता या तलावाजवळ 'माय इंडिया' नावाचा सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आला आहे. या पॉईंटचे उद्घाटन स्थानिक आमदार नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आले.

पवई तलाव येथे 'माय इंडिया' या नावाने सेल्फी पॉइंट

By

Published : Sep 2, 2019, 8:30 AM IST

मुंबई -शहराच्या पूर्व उपनगरातील स्थानिक आमदार नसीम खान यांच्या आमदार निधीतून पवई तलाव येथे 'माय इंडिया' या नावाने सेल्फी बनवण्यात आला आहे. पवई तलाव भागात मोठ्या संख्येने पर्यटक व नागरिक येत असतात. या भागात नागरिकांकडून फोटो घेण्याची हौस असते, यासाठीच इथे आता अधिकृत असा सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आला आहे.

स्थानिक आमदार नसीम खान यांच्या आमदार निधीतून पवई तलाव येथे सेल्फी पॉइंट

सेल्फी घेणे हा प्रकार आता सर्वत्र पसरला असल्याने सेल्फीसाठी काही धोकादायक जागी उभे राहून व धोकादायक स्टंट करून आपला जीव गमवावे लागल्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झालेले दिसतात. यामुळे जागोजागी पर्यटन स्थळी सेल्फी निर्माण केल्याने पर्यटनात देखील भर होते व संभाव्य होणारा धोका काही प्रमाणात टाळता येतो.

हेही वाचा... वईत विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन

पवई तलाव हा मुंबई पूर्व उपनगरातील आकाराने मोठा व प्रसिद्ध तलाव आहे. या तलावावर मोठ्या प्रमाणात युवक-युवती फिरण्यासाठी येत असतात., तर नागरिक व पर्यटक या तलावावर येऊन निसर्गसंपन्न अशा वातावरणात काही वेळ घालवतात. या तलावात वर्षभर पाणी असते, येथुन जवळूनच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जातो तो पूर्व-पश्चिम उपनगराला जोडतो. परिसरात असणारी पंचतारांकित हॉटेल्स, आयआयटी परिसर यामुळे साहजिकच येथे फिरायला येणारे नागरिक व पर्यटक यांची संख्या अधिक असते.

हिरानंदानी व गोपाल शर्मा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांच्या सोबत सेल्फी घेऊन पवईच्या 'माय इंडिया' सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

हेही वाचा... हैदराबादच्या धर्तीवर पवई तलावात भगवान बुध्दांचा पुतळा उभारा - आमदार नसीम खान

स्थानिक आमदार नसीम खान यांनी या ठिकाणचे पर्यटन लक्षात घेऊन, आपल्या आमदार निधीतून माय इंडिया नावाच्या सेल्फी ची येथे निर्मीती केली आहे. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन रविवारी उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा... मुंबईत संततधार कायम; पवई तलाव भरला, पर्यटकांची गर्दी

हेही वाचा... पवई तलावाची डम्पिंग कडे वाटचाल?​​​​​​​

ABOUT THE AUTHOR

...view details