मुंबई -बेस्ट परिवहन उपक्रमाची पहिली पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वातानुकूलित बस सेवा सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. बस क्रमांक 302 ही पूर्व उपनगरातील प्रतीक्षानगर ते सायन-मुलुंड मार्गावर ही बस चालविण्यात येणार आहे.
एकूण 6 एसी व 4 नॉन एसी इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्ट उपक्रम घेणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत.
हेही वाचा... देशात मंदी असल्याचे उध्दव ठाकरेंनी केले मान्य; तरीही, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा
बसचे वैशिष्ट्ये
संपुर्ण पर्यावरणस्नेही अशी ही इलेक्ट्रिक बस आहे. या बसचे चार्जिंग स्टेशन धारावी बस आगारात असणार आहे. साधारणतः एकदा चार्ज केल्यास ही बस संपूर्ण दिवस चालेल, अशी या बसची खासियत आहे. बसला क्लच नसल्याने चालकांचा त्रास कमी होणार आहे.