मुंबई -इगतपुरी विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.
काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित करणार शिवसेनेत प्रवेश - मुंबई news
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांनी मंगळवारी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.
आमदार निर्मला गावित यांनी मंगळवारी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. यामुळे गावित यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.
निर्मला गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश बुधवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल. गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गावित यांना बुधवारी शिवसेना प्रवेश करण्याबाबत सांगितले आहे.