मुंबई -आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी सोमवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली होती, याबाबत अजित पवार यांनी ट्विटरवर सरकारविरोधात तीव्र टीका केली आहे.
राज्यातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटण्याचे काम करणारे हे सरकार लोकशाहीला मारक असल्याची जोरदार टीका अजित पवारांनी केली आहे.
हेही वाचा... आरटीओ भरतीत निवड होऊनही नोकरी न मिळाल्याने उमेदवारांनी चंद्रकांत पाटलांना घेरले
हेही वाचा... वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय
काय आहे प्रकरण ?
राज्यातील सहायक मोटार वाहन परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना वगळल्याबाबत परीक्षार्थी संतप्त होते. राज्य शासनाच्या 2014 च्या निर्णयाप्रमाणे खुल्या वर्गातील तरुणांना शिफारसपत्र देण्यात आले होते. तरीही त्यांना वगळण्यात आले. आता 2018 मधील नव्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षणामधील खुल्या वर्गात राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने 135 मराठा तरुणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे मराठा परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळेच संतप्त विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन जाब विचारण्याचे ठरवले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची हे सरकार फसवणूक करत असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा... महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टीस देते कौशल्य विकासाचा मंत्र
हेही वाचा... वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी १५ लाखांची मागणी; वेळीच लक्षात आली फसवणूक