मुंबई -शहरातील आरे जंगलाबाबत वातावरण तापले असतानाच, आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का? असा सवाल करत मुंबईच्या जनतेशी सर्वाधिक गद्दारी आदित्य यांनीच केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का ?, आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांची आदित्य ठाकरेंवर टिका. मुंबईतील 'आरे' जंगल बचाव मोहिमेत आता राजकीय नेते देखील सहभागी झाले आहेत. यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
हेही वाचा...नाणारचं झालं तेच आरेचं होईल - उध्दव ठाकरे
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का ? - प्रीती शर्मा मेनन
शिवसेनेला महानगरपालिकेत एखादी गोष्ट पास करायची असेल, तर ते फ्लोर मॅनेज व्यवस्थित करतात, पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत. आदित्य ठाकरे मुंबईकर आहेत. मुंबईबाबत आणि आरे वाचवण्यात ते विधाने करत असतात. मात्र, त्यांनी व त्यांच्या पक्षाने आरे संदर्भात केवळ चटकदार ट्विट करण्यापलीकडे काहीही केलेले नाही, अशी टीका आप पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
हेही वाचा... अखेर आघाडीचे गणित ठरले! जागावाटपात राष्ट्रवादीची सरशी ?
..तर मी आदित्य ठाकरेंची माफी मागून त्यांना मुंबईचा हिरो बोलेल - शर्मा मेनन
आदित्य ठाकरे अशी व्यक्ती आहे, जिला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते हट्ट करायला लागतात. आदित्य यांनी आरेत मेट्रो शिरू दिली नाही, तर मी त्यांची बिनशर्त माफी मागायला तयार आहे, असेही प्रीती शर्मा मेनन यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा... अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून युतीत रस्सीखेच
मुख्यमंत्र्यांसाठी मुंबई म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी - प्रीती शर्मा मेनन
देवेंद्र फडणवीस हे मुंबईकर नाहीत. त्यांना मुंबईतील नाजूक पर्यावरणीय परिस्थितीची पुरेशी जाण नाही. त्यांच्यासाठी मुंबई ही फक्त बक्कळ पैसा उभा करून देणारी रियल इस्टेट अर्थात सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष हे मोठे बिल्डर मंगल प्रभात लोढा आहेत. मुंबईकडे केवळ स्क्वेअर फुटाच्या नजरेतून पाहण्याच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो, अशी टीका प्रीती यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.