मुंबई : मुंबई (Mumbai) हे जागतिक दर्जाचे शहर व भारताची आर्थिक राजधानी आहे. याच मुंबईमध्ये वयोवृद्धांची संख्या कमी असून तरुणांची संख्या अधिक आहे. वयोवृद्धांच्या प्रमाणात तरुणाची संख्या सहापट अधिक आहे. यावरून मुंबई तरुणाईकडे वाटचाल करत आहे. येत्या काही वर्षात हे प्रमाण अधिक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे (New identity as the city of youth) तरुणाईचे शहर अशी मुंबईची नवी ओळख तयार झालेली आहे.
कोणत्या वयाचे किती नागरिक :मुंबईमध्ये (Mumbai) २०११ च्या जनगणने प्रमाणे १ कोटी ३० लाख नागरिकांची नोंद आहे. त्यात १८ वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या ९० लाख ७८ हजार ९५२ इतकी आहे. त्यात ६० वर्षांवरील ११ लाख ७ हजार ३९१ वयोवृद्ध नागरिक आहेत. ४५ ते ५९ वयामधील १९ लाख १६ हजार ८१४ तर १८ ते ४४ वयामधील ६० लाख ५४ हजार ७४७ नागरिक आहेत. १८ ते ४४ वयोगटातीला नागरिकांची संख्या वयोवृद्धांच्या सहापट आहे. तर ४५ ते ५९ वयाच्या नागरिकांच्या प्रमाणात तीन पट आहे. यामुळे मुंबईमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही १८ ते ४४ वायातील नागरिकांची आहे.
मुंबईतील जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला : मुंबईमध्ये (Mumbai) २०१७ मध्ये १ लाख ५५ हजार ३८८ बालकांचे जन्म झाले. त्यावेळी जन्मदर १२.२० टक्के होता. २०१८ मध्ये १ लाख ५१ हजार १८७ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ११.८३ टक्के जन्मदर होता. २०१९ मध्ये १ लाख ४८ हजर ८९८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी जन्मदर ११.६१ टक्के इतका होता. २०२० मध्ये १ लाख २० हजार १८८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ९.३३ टक्के इतका जन्मदर होता. २०२१ मध्ये १ लाख १३ हजार ७७८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ८.८१ टक्के इतका जन्मदर नोंदवला गेला. २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे.