महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chetan Kadam killed in accident वांद्रे वरळी सी लिंक अपघातात राष्ट्रवादीचे नेते चेतन कदम यांचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी - चेतन कदम अपघात मृत्यू

वांद्रे वरळी सी लिंक अपघातात ( Wandre worli sea link accident ) राष्ट्रवादीचे नेते चेतन कदम ( NCP leader Chetan Kadam killed accident ) यांचा मृत्यू झाला आहे.

अपघात
अपघात

By

Published : Oct 5, 2022, 1:50 PM IST

Updated : Oct 5, 2022, 2:16 PM IST

मुंबईवांद्रे वरळी सी लिंक अपघातात ( Wandre worli sea link accident ) राष्ट्रवादीचे नेते चेतन कदम ( NCP leader Chetan Kadam killed accident ) यांचा मृत्यू झाला आहे. या रस्ता अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे-वरळी सीलिंकवर भीषण अपघात झाला. पहाटे 3.30 च्या सुमारास चार कार एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. 8 जण गंभीर जखमी झाले आहेत


आज पहाटे वांद्रे -वरळी सी लिंक वर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून . त्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्री चेतन कदम यांचादेखील जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे. या अपघातात आठ जण गंभीरित्या जखमी झालेले आहेत. जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेत झाल्याने पक्ष संघटनेत तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. वांद्रे वरळी सीलिंक देखभालीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे.

कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचा आरोपया अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता, सिलिंक वर काही मिनिटांपूर्वीच झालेल्या अपघातातील जखमींना ॲम्बुलन्सद्वारे उपचारार्थ नेण्याची व्यवस्था करत असताना मागून येणाऱ्या एका भरधाव कारने या कर्मचारी व उपस्थितितांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. अपघात घडल्यास त्यासाठी करावयाची उपाययोजना, एक्झिट पॉईंट अथवा सुरक्षिततेचे उपाय याची कोणतीही व्यवस्था सिलिंकवरील टोल वसुलीचे आणि मेंटेनन्सचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी केला आहे. या दुर्दैवी अपघातात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींना शासनाने अति तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी तसेच कंत्राटदार कंपनीस जबाबदार धरून संचालकांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

Last Updated : Oct 5, 2022, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details