महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईतील अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई एनसीबीने 13 मे रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई करत दीड कोटी रुपयाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एनसीबीने एकाला अटक केली आहे. मुंबई एनसीबीची मोठी कारवाई आहे. अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असून, त्याने दिलेल्या माहितीवरून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अटक केलेल्या आरोपीकडील मोबाइल जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये हा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

जप्त मुद्देमाल
जप्त मुद्देमाल

By

Published : May 14, 2022, 9:42 PM IST

मुंबई -मुंबईतील अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई एनसीबीने 13 मे रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई करत दीड कोटी रुपयाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एनसीबीने एकाला अटक केली आहे. मुंबई एनसीबीची मोठी कारवाई आहे. अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असून, त्याने दिलेल्या माहितीवरून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अटक केलेल्या आरोपीकडील मोबाइल जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये हा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

मुंबई एनसीबीने ही धडक कारवाई करून दीड कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या. संपूर्ण नेटवर्क ट्रेस करण्यासाठी अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या कारवाया करून एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीकडून जाहीर करण्यात आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.13 मे) रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत 1 हजार 770 किलो गांजा हायड्रोपोनिक वीड, गांजा जप्त करण्यात आला आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी अमित घावटे यांनी ही माहिती दिली आहे.

पहिल्या ठिकाणी एनसीबीच्या पथकाने विदेशी टपाल कार्यालयातून अमेरिकेतून पाठवण्यात आलेले पार्सल जप्त केले. त्या पार्सलमध्ये 850 ग्रॅम गांजा होता. या कारवाइत आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याविरोधात 10 गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या कारवाईत एनसीबीने 920 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ते पार्सलही अमेरिकेतून पाठवण्यात आले होते. फॉरेन पोस्ट ऑफिसमधून ते जप्त करण्यात आले.

हेही वाचा -CM Uddhav Thackeray on BJP : मुंबई तोडणाऱ्यांचे लचके तोडू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details