मुंबई - मुंबई एनसीबीकडून मुंबईत दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये करोडो रुपयांचे ड्रग्स पकडले ( NCB Raids Two Places Seized Drug ) आहे. एनसीबीने ड्रग्ज पुरवठादार आणि पेडलर्स विरुद्धची आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मध्ये 970 ग्रॅम अॅम्फेटामाइन 104 ग्रॅम एक्स्टसी टॅब्लेट 02 ग्रॅम वजनाचे एलएसडीचे 100 पेपर ब्लॉट आणि 25 ग्रॅम कोकेन जप्त केले. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात करोडो रुपये किंमत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एनसीबीने 23 मे आणि 25 मे रोजी मुंबईत विविध ठिकाणी ही कारवाई केली. याप्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पहिली कारवाई अंधेरी पूर्व परिसरात तर दुसरी कारवाई फॉरेन पोस्ट ऑफिस मुंबई येथे केली. ड्रग्ज प्रकरणी एकाला मुंबईतून तर एकाला गोव्यात ताब्यात घेण्यात आले असून, एनसीबीची अधिकारी आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.
एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मुंबईच्या पथकाने 23 मे 2022 रोजी अंधेरी पूर्व येथे एका ठिकाणी छापा टाकून 970 ग्रॅम अॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले. जप्त केलेले ड्रग्ज चार वेगवेगळ्या गडद तपकिरी रंगाच्या लाकडी अॅशट्रेमध्ये लपवून ठेवले होते. हे पार्सल न्यूझीलंडला नेण्यात येणार होते. एनसीबीने हे ड्रग्ज हस्तगत करीत याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत एनसीबी मुंबईच्या पथकाने 25 मे 2022 रोजी फॉरेन पोस्ट ऑफिस येथे कारवाई करत 104 ग्रॅम एक्स्टसी टॅब्लेट 02 ग्रॅम वजनाचे एलएसडीचे 100 पेपर ब्लॉट्स आणि 25 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेले ड्रग्ज दोन सिल्व्हर फॉइल पॅकेटच्या आत कार्डबोर्डमध्ये लपवून ठेवण्यात होते. हे पार्सल फ्रान्समधून आणून गोव्यात पाठवण्यात येणार होते. एनसीबी गोवाच्या पथकाने तात्काळ रिसीव्हरला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. एनसीबीने रात्रभर कारवाई करत एका व्यक्तीला गोव्यात ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीचे अधिकारी त्याची चौकशी करीत आहेत.
हेही वाचा -Nagpur : नागपुरातील बालकांना एचआयव्ही लागण प्रकरण; मानवधिकार आयोगाची मुख्य सचिवांना नोटी