महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समृद्धी महामार्गाची वाट 'खडतर'; कोरोनाच्या विळख्याने कामाला संथगती - समृद्धी महामार्ग संथ गतीने

गेल्या तीन महिन्यापासून मात्र या प्रकल्पाच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिने काम पूर्णपणे बंद होते. तर आता काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पातील मजुरही कोरोनाच्या भीतीने आपपल्या गावी परतले. त्यात मे च्या दुसऱ्या आठवड्यात कामाला सुरुवात करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार काम सुरू झाले खरे. पण अजूनही कामाने वेग काही घेतलेला नाही.

samruddhi highway
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 4, 2020, 1:35 PM IST

मुंबई- मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची वाट महाविकास सरकारच्या काळात कोरोनामुळे खडतर झाली आहे. लॉकडाऊन काळात या प्रकल्पाचे काम मे पासून सुरू झाले खरे, पण 50 टक्के मजूरांची कमतरता असल्याने काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकल्पास मुदतवाढ द्यावी लागणार असून प्रकल्प पूर्णत्वास मोठा विलंब होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे 700 किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळेच या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पण गेल्या तीन महिन्यापासून मात्र या प्रकल्पाच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिने काम पूर्णपणे बंद होते. तर आता काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पातील मजुरही कोरोनाच्या भीतीने आपपल्या गावी परतले. त्यात मे च्या दुसऱ्या आठवड्यात कामाला सुरुवात करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार काम सुरू झाले खरे. पण अजूनही कामाने वेग काही घेतलेला नाही.

परराज्यातून अजूनही समृद्धी प्रकल्पातील 50 टक्के मजूर परत आलेले नाहीत. त्यामुळे कामही संथ गतीने सुरू असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. मजूरांची व्यवस्था करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व कंत्राटदारांना सूचना देत मजूरांची व्यवस्था करत कामाची गती वाढवण्यास सांगितले आहे. मात्र मुळात मजुरच मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे समृद्धीलाही त्याचा फटका बसत आहे. परिणामी प्रकल्प पूर्णत्वास आता मोठा विलंब होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details