मुंबई -महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Corporation कर्मचारी अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्यात आले आहे. मात्र वेतन देताना प्रचंड वेतन कपात करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्तांनी Mumbai Corporation Commissioner वेतनामधील तफावत मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांना द्यावी, अन्यथा महापालिका मुख्यालयातच गणेशोत्सव Mumbai Municipal Union Agresive For Salary Difference साजरा करू, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी Mumbai Corporation Commissioner लक्ष घालावे, अशी मागणीही बने यांनी पत्राद्वारे केली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोषमुंबई महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Union कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी वितरित करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रचंड वेतन कपात करण्यात आलेली आहे. अनेकांना १ हजार रुपये देखील पगार हातात आलेला नाही. कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना, प्रशासकीय गलथानपणामुळे अशा प्रकारची वेतन कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर विषयाबाबत आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून कपात केलेले वेतन गणेशोत्सवापूर्वी Ganesh Festival मंगळवारी देण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा संबंधित कामगार, कर्मचारी महापालिका मुख्यालयात गणेशोत्सव Ganeshotsav Celebrate At Mumbai Corporation Headquarter साजरा करतील, असा इशाराही रमाकांत बने यांनी दिला आहे.